ब्रेकअप- प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग #५

ब्रेकअप- प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग #५

💕भाग# 5💕

"कधी कुठे वेळ गेला तेच समजलं नाही,पण ना भूक तर मला पण जोराची लागलीये खूप च,आणि हो एवढं काय खास फिल्मी नव्हतं प्रपोजल फक्त जे गिफ्ट दिल ना ते खास आहे माझ्याकडे अजून आहे ,हे बघ" अक्षरा अधिराज दाखवत म्हणाली..

"किती गोड ग ,आई नाहीतर आज काल गिफ्ट ची काही किंमतच नाही,सरळ हरवलं म्हणून विषय सोडून देतात" अधिराज परत नाराजीच्या सुरात म्हणाला..

"जाऊ दे सांग डॅडा तू पुढचं" अधिराज..

"कॉलेज चा शेवटचा दिवस होता,माझा.. म्हणजे स्टुडंट म्हणून...हिला भेटायला मी परत येणार होतोच पण जाताना नात्याला नाव देऊन जावावं म्हणून ठरवलं होतं.. माझा पण शेवटचा पेपर होता त्यादिवशी…

माझ्या फ्रेंड ने त्यादिवशी तुझ्या आई ला, मॅडम च नाव सांगून आमच्या खालच्या लॅब मध्ये घेऊन आला होता…

मी एकटाच होतो तिथे…" अभिमन्यू बोलत होताच..

"आणि काय तर समोर डॅड तुझा,मी मॅडम ला शोधायला निघाले तेवढ्यात ,म्हणतोय कसा मीच बोलावलंय तुला..मला एका रिऍकशनचा रिझल्ट मिळत नाही...तेवढ्या साठी हेल्प हवी आहे मला.. " अक्षरा म्हणाली..

"खूप राग आला होता तिला,लाल बुंद झाली होती.." अभिमन्यू म्हणाला..

"मग पुढे काय झालं" अधिराज…

"काय होणार,मला म्हणतोय कसं..हायड्रोजन चे दोन अटॉम आणि एक ऑक्सिजन चा एक ऍटम दे,मला आणि सांग…. काय होतंय रिअकॅशन.." अक्षरा…

"काय डॅड, पाण्याची रिअकॅशन,थोडी ना लगेच होणार होती" अधिराज हसत म्हणाला..

"तस नाही,मला म्हणायचं होते जस आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही ना,तशी तू आहेस माझ्यासाठी...पण मला ते जमेनाच झालं…." अभिमन्यू..

"हो,ना तुझ्या डॅड चा रोमान्स म्हणजे लॅब मध्ये आल्या सारख वाटायचं मला"अक्षरा हसत म्हणाली…

"मग पुढे" अधिराज…

"मग काय तेव्हा,'अस कस होणार आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी होणार ना,आणि आता ही वेळ आहे का की पाणी तयार करण्याची...तू खरंच मंद आहेस" अक्षरा म्हणाली..

"अग, हो मग पाणी जस आहे ना तस तू मला आहेस, आयुष्याचा शेवट तू आहेस माझ्या… तुझं चिडन मला खूप आवडते म्हणून सहज म्हणल अस…

मी खाली गुढग्यावर खाली बसलो आणि तिला ब्रेसलेट देत विचारले,माझ्या आयुष्याचा अच टू ओ होशील ना तू??? माझं सगळं आयुष्य तुझ्यासोबत घालवायच आहे,माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..आणि नकळत तुझ्या ब्रेकअप ने ते अजून वाढलं आहे…" अभि बोलत होता..

"हो का,तू पहिली आपल्या प्रपोजलं मधून केमिस्ट्री काढून टाक..माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणजे जे अगदी मनापासून निघालाय ना ते वाले जे मनापर्यन्त पोहचते...मी दीड महिना तुझ्याशी न बोलता पण तुझ्यासोबत होते..जे त्या वेळेत मला समजलं ना ते विलक्षण अनुभव होता आणि पक्के झालं माझं पण तूच माझा मितवा.." अक्षरा हसत सांगत होती..

"आम्ही दोघांनी पण घट्ट मिठी मारली,आणि दोघांच्या डोळ्यात पाणी आलं होतं" अभि म्हणाला…

"खास नव्हतं आमचं अस काही प्रपोजचा सिन पण मनापासून होता" अक्षरा म्हणाली..

Click to Read More...
Leave a Reply

To leave a comment, please Login or Register

Comments (0)