ब्रेकअप- प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग # ३

ब्रेकअप- प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग # ३

💕भाग#३💕"तुझी आई माझ्या पेक्षा तशी दोन वर्षांनी लहानच,त्यादिवशी मी लॅब मध्ये होतो, माझं प्रोजेक्ट चालू होते आणि मला काही केल्या रिझल्ट मिळत नव्हता म्हणून मी पूर्ण जीव ओतून काम करत होतो, तेवढ्यात लॅब च्या दरवाज्यात मला आवाज आला…'प्लिज मॅम,तुम्ही साइन नाही केली तर इंटर्नलचे मार्क्स नाही मिळणार मला….त्यादिवशी खरंच घरी प्रॉब्लेम होता म्हणून मी येऊ नाही शकले पण तुम्ही चेक करा ना आता,हवं तर मी परत प्रॅक्टिकल करून दाखवते' एवढं कोण आहे ते पण मोरे मॅडम ला विनवण्या करत आहे म्हणून मी सहज पाहिलं.. 'सुंदर गुलाबी टॉप घातलेली,पेन्सिल बॉटम ची जीन्स,हातात जर्नल आणि केस मोकळे सोडलेले,मस्त दिसत होती ती" अभिमन्यू सांगत होता.

"माझं काही लक्ष नव्हतं पण मला जाणीव होती की कोणी तरी माझ्याकडे पाहतय म्हणून,मी हळूच पाहण्याचा प्रयत्न केला पण मॅडम समोर होत्या ना म्हणून मग नाही पाहिलं मी" अक्षरा ने सांगितलं…

"म्हणजे आईने अजून पहिलच नाही का तुम्हाला" अधिराज म्हणाला…

"तेव्हाच नाही,पुढचे सात दिवस ती कोणत्या क्लासला आहे हे मला समजलेच नाही ,एवढंच नाही परत ती मला दिसलीच नाही,कुठेच" अभिमन्यू म्हणाला..

"माझ्या तर काही डोक्यातच नव्हतं, कोणी मला पाहण्यासाठी एवढं आतुर आहे म्हणून" अक्षरा …

"साधारणतः सात दिवसानंतर माझं प्रॅक्टिकल संपल्यावर मी तिथेच बाहेर ,पलीकडे क्लास रूमच्या बाहेर बसलो होतो म्हणजे सगळेच आम्ही,तेव्हा पण मी आधीच दमून गेलो होतो प्रॅक्टिकल मुळे आणि पुन्हा तोच आवाज….'सर,माझ्या फ्रेंड आल्या नाहीत म्हणून मी पण नाही आले कॉलेजला ,मी कशी येणार ना,एकटी खरंच सांगतेय मी सर, परत तीच मुलगी...अप्रतिम… सर हसत होते तिच्या निरागस पणावर...सगळा क्लास पाहत होता तिच्याकडे…. परत ती बोलते..'सर,मला खोट नाही बोलता येत,दुसर काही कारण असते तर मी सांगितलं असते पण त्यादिवशी ह्या चौघी नाही आल्या मग मी कसं येणार ना' सर परत हसले…' बसा खाली ,बसा'.... थोडं हुश्श करत तिने दरवाज्यातून बाहेर पाहिलं आणि बाहेर मी तिच्याकडे एकटक पाहत होतो...माझ्या पण चेहऱ्यावर स्मित हास्य होते ,ते पाहून ती पण हसली…. जणू काही आमची ओळखच आहे म्हणून" अभिमन्यू सांगत होता….

"हो ना,म्हणजे माझ्या मनात काही नव्हतं,समोरचा हसला की हसायचं आपण पण ,स्माईल कुठे विकत आणावी लागते म्हणून हसले ,अस काही फिलिंगस नव्हत्या.. आणि त्या दिवशी क्लास मध्ये सगळेच माझ्यावर हसत होते ना,म्हणून मग त्याला पण समजलं असेल म्हणून हसत असेल तो म्हणून मी पण हसले,एवढंच…" अक्षरा…..

" त्या नंतर,मला एवढं तर समजलं होते की ,तिचा तो क्लास आहे,आता जेव्हा पण वेळ भेटायचा तेव्हा मी तिच्या क्लास समोर जाऊन बसायचो,तिला रोज पाहायचो...तिचा गोंधळ...कधी बेंच वर उभ राहून मस्ती करताना..तर कधी जोक्स करताना…. भारी वाटायचं मला तिच्याकडे पाहिलं की...आणि तुला सांगू जेव्हा पण मी स्माईल केली ना की लगेच ती पण स्माईल रिटर्न द्यायची मला….तिच्या स्माईल ची जादू अजून पण आहेच ना माझ्यावर…." अभिमन्यू म्हणाला…

Click to Read More....


Leave a Reply

To leave a comment, please Login or Register

Comments (0)