
फुलपाखरू भाग # ४
हॉस्टेल आणि मामाचे गावं
हॉस्टेलला राहावे लागणार होते,सगळे पाहुणे होते पण ,उगीच ओझे नको कोणाला आणि उपकाराच्या ओझ्याखाली रोज दबण्यापेक्षा,बाहेर राहिलेलं कधी पण सोयीस्करच!
आता हॉस्टेल म्हणलेले की सगळे नवीनच आले,सगळे बदललेच की परत,८१% टक्के म्हणले की सगळ्यांना वाटत च होते की आता प्रवेश नक्कीच समजावा पण झाले सगळे उलटेच,सोलापूर जिल्ह्याची मेरीट लिस्ट ९६% लाच बंद झाली,आणि आता प्रवेश भेटणे खूप अवघड काम झाले.
त्यावेळी तितली ला मनातल्यामनातच वाटून गेले,स्पर्धा कधी पूर्ण होतच नाही,बाहेरच्या जगाशी स्पर्धा तर कधीच करू नये,खरतर एवढे चांगला अभ्यास करून पण जर आज आपल्याला प्रवेश मिळत नसेल तर आपण शूद्रच झालो की ,का या गोष्टीवर आपण खुश होयचो की आपण बोर्ड परीक्षेमद्धे ,केंद्रात पहिले आलोय,आपले नाव शाळेच्या ऑफिस मध्ये अशा एका पेंट ने लिहिले आहे ते कधीच पुसले जाणार नाही आणि ते तसच ईतिहास जमा होईल.शेवटी आनंद मानण्यात असतो.एक तर नक्की आहे की,इथून पुढे स्पर्धा स्वत:शी मागची बेरीज करायची आणि अजून काय काय राहिले आणि काय काय वजा करायचे आहे ते पाहत च पुढे जायचे ,पण बाहेरच्या जगाची स्पर्धा नको रे बाबा ! मन कमजोर होऊन जाते आणि नैराश्य येते मग लगेच. मानवी मन तर असे आहे ना की,सुखात ही दु:खच जास्त शोधत असते,थोड्या दुखा:त तर जगण्याची अपेक्षाच नको. म्हणून तर आता फक्त स्वत:चा विकास करायचा आणि खूप मोठे होयचे ,खूप मोठे! पण तितली ने अजून ठरवले नव्हते नेमकं काय होयचे आहे ते,फक्त एवढेच वाटायचे की खूप मोठे होयचे ,एक ओळख बनवायची,स्वत:ची.
कसे बसे करून ,थोडा मोठ्या लोकांच्या ओळखीने आणि तिच्या गुणांमुळे तिला प्रवेश मिळाला खरं,प्रवेश झाला,तिथेच होस्टेलला पण प्रवेश घेतला,कॉलेज चालू होण्याची तारीख पण संगितले,आता पुन्हा सगळे बदलणार होते,पण हा बदल तिला चांगला वाटत होता,गाव आता सुटणार होते,शिकण्यासाठी का होईना.
कॉलेज ला जायचे म्हणल्यावर,सगळे खरेदी तर करावी लागणार ना,गादी,बादली-मग,गजरचे घड्याळ,तिथे रोज वापरायला नवीन कपडे आणि बरच काही,चांगले मार्क्स मिळाले होते म्हणून तितलीच्या बाबांनी पण काही काटकसर केली नाही,तिला जे पाहिजे ते तिला सगळे त्यांनी दिले. आई आली होती तिच्यासोबत खरेदीला ,काय नको काय पाहिजे ते सगळे घेतले.
तितली आणि तिच्या आई चे कधीच जास्त अस नात छान नव्हते म्हणजे आपण मालिका मध्ये पाहतो ना तसं,तितली ला नेहमी वाटायचे की तिच्या आईला ती अजिबात आवडत नाही म्हणून सारखी तिला मारायची आणि खूप कठोर शब्दात बोलायची पण तितली ला त्या मागचे प्रेम ,आईची माया कधीच समजली नाही. तिच्या बाबांना वाटले की आता तरी दोघी लांब राहिल्यावर तर समजेल पण तस काहीच झाले नाही. चूक तितलीची होती ,तितली ने कधीच आईचे ओरडणे चांगल्या हेतूने घेतले नाही,प्रत्येकवेळी तिला असच वाटायचे की माझ्या आईला मी नको आहे म्हणून,पण एक दिवस हे सगळं बदलणार होते आणि एक घट्ट मैत्रीचे नाते तयार होणार होते,हे कधी होणार हे मात्र कोणालाच माहीत नव्हते.