आठवणीतील लहानपण !!!!

आठवणीतील लहानपण !!!!

# लहानपण"लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा

ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा,

बालपण किती सुख विलासात गेले

हवेचे झुळूक जसे झाडवरची फुले ,

खेळता बागडता क्षणात दिस गेले

मस्ती मौज करता तरुणपण आले ,

मित्रांची मैफिल घेऊन सारे गाव पिंजले

वेशीवारची आमराई शिवारातील फुले

झाडवरचा तो झोपडा नदीकाठाची घरे "बालपण म्हणलं की सगळं सुखाचे क्षण येतात आणि त्या आठवणीत डोळ्यात पाणी पण. 

काय पण ते दिवस होते लाडाकोडाचे भरभरून लाड करून घेण्याचे, बोट ठेवले ती गोष्ट कशी ना अगदी लगेच मिळून जायची,आणि आता स्वतः कमवत असून पण हजार वेळा विचार करावा लागतो मग कुठं ती वस्तू आपली होते. 

लहानपणची मजाच वेगळी असते आणि आपण खूप नशीबवान आहे की जे लहानपण आपण आनंदाने अनुभवलं आणि गोड आठवणीत सजवलं पण. 

बाकी असे पण आहेतच की ज्यांना याच बालपण पण आठवायची इच्छा होत नाही,त्याच्याविषयी आपण एखाद्या दुसऱ्या लेखात बोलूयात.

आणि अजून तस सांगायच म्हणलं तर मुलींना त्यांचं बालपण पुन्हा जगातच येत नाही मुलांच्या तुलनेत. मोठी झाली आणि कितीही जबाबदारी असली तरी मुलं कुठे सोडतात त्याचं बालपणीचे खेळ पण मुलीचे तस नाही ना होत...

अंशिका, सगळ्यात लाडाची आणि हो एकलुती एक. तिला ना सगळ्यात जास्त अगदी लहानपणापासून सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सायकल. 

अगदी नुकतेच दोन वर्षांची झाली की तिच्या बाबाने तिला छोटी सायकल दिली. 

अगदी मोडे पर्यन्त तिने ती सायकल चालवली,शेवटी भंगारात पण फुकटच द्यावी लागली ना!

"बाबा,आता ना मी मोठी झाली आहे ना,मला ती वाली सायकल घेऊन दे ना,रुद्रा वाली ,कार्टून मध्ये नाही का ती" अंशिका.

"हो हो घेऊयात की अगदी तूच चल सोबत माझ्या." बाबा.

"मज्जा" अंशिका.

अंशिका जास्त नाही पण चार वर्षाची झाली होती.

रुद्रा पाहून त्यांच्यासारखाच मॅजिक करणारी सायकल अंशिका ला पाहिजे होती. 

अंशिका आणि बाबा दुकानात जातात,सायकल खरेदीसाठी...

"काका,रुद्राची सायकल द्या" अंशिका.

"अरे बापरे,देतो हा ताई" काका…

तिच्यापुढे सायकल ठेवताच काका म्हणाले," बघ बर ही आवडली का??"

"आवडली पण ही मॅजिक नाही ना करत " अंशिका.

"अग मॅजिक तर तुझ्या चालवण्यात आहे,जेव्हा तू याची दोन चाक काढून फक्त दोनच चाकावर चालवशील ना तेव्हा मॅजिक कळेंन तुला" काका हसतच तिला म्हणतात.

अंशिका खुश होऊन बाबांसोबत ती सायकल घेऊन घरी येतात. 

इथून चालू होता अंशिका चे सायकलस्वार,अगदी कॉलेज ला पण ती मस्त सायकलवर च जायची,सायकल वर जायला तिला अजिबात लाज वाटायची नाही उलट तीच सगळ्यांना सांगायची ,सायकलिंग मूळेच फिट आहे आणि माझी फिगर पण!!!!

Click to Read More...


Leave a Reply

To leave a comment, please Login or Register

Comments (0)