ब्रेकअप: प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग # ६ (अंतिम भाग )

ब्रेकअप: प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग # ६ (अंतिम भाग )

💕भाग#६💕(अंतिम भाग)

"माझं प्रेम आहे म्हणजे ,आम्ही ओळखतो एकमेकांना एक वर्ष झालं पण आमच्यात भांडण होतात जास्त, मी जेव्हा तिला पाहिलं तेव्हा पासून ती मला आवडायला लागली,पण ना..तिच्याकडून प्रेम अस काही मिळतच नाही मला..मला ती आवडते पण चीड चीड,भांडण होते सारख...मग माझी चूक नसताना मी तिला सगळं विसरून माफ करतो आणि नात टिकवतो..पण आता ना मी पण कंटाळून गेलोय...ती भांडण करून मस्त ब्रेकअप पार्टी करते आणि निवांत मजा करते...काहीच पडलेले नसते आणि माझी चीड चीड शिगेला पोहचते.. आणि मग राग येतो आणि मग अस काही तरी हातातून होते माझ्या" अधिराज ने एकदाच सांगून टाकले..

"ठीक आहे,नॉर्मल आहे...गरजेचे नाही ना...की समोरच्याला पण आवडलं पाहिजे म्हणून आपण...कधी कधी काय होते सांगू का??आवडणारी प्रत्येक गोष्ट प्रेम नसते रे...प्रेम म्हणजे मन जोडलं पाहिजे..न बोलता पण भावना समजल्या पाहिजेत… आठवण अशी हवी की ,तू आठवण काढायला आणि तिने समोरून म्हणायला बोलावलं का….ओढ दोघांना हवी आहे…. ब्रेकअप म्हणजे काय असते रे?? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव,खऱ्या नात्यात कधीच ब्रेकअप होत नाही, थोड्या दिवसनासाठी अबोला राहु शकतो पण लांब निघून जाणं किंवा कायमच बोलणं बंद होणे अस कधीच होत नाही…. खऱ्या नात्यात जेव्हा पण तू ब्रेकअप करशील ना तर तेवढ्याच त्रिवतेने ते प्रेम दुपटीने समोर येते…" अक्षरा अधिराज ला समजावून सांगत असते..

"आणि आता केलय ना तिने ब्रेकअप तर तू नको बोलू तिच्याशी...थोडा वेळ घ्या...तुझ्या प्रेमाची जाणीव तिला असेल तर ती तुला नव्या रूपाने तुझ्याकडे येईल आणि तिला काहीच वाटत नसेल तर ती नाही येणार ,ती दुसरा ऑपशन शोधेल..प्रेम मागून मिळणारी गोष्ट नाही,नशिबात पण असावी लागते..आणि प्रत्येकाच्या नशिबात ती असतेच फक्त त्याची वाट पाहायला लागते ..नाहीतर मग आकर्षणाला प्रेम समजून परत मनाची कोंडी होऊन जाते आणि लग्नासारख्या सुंदर नात्याची आयुष्याची बेडी वाटायला लागते" अभिमन्यू म्हणाला..

"माझं भाग्य आहे की तुम्ही माझे आई-बाबा आहात, बोलून छान वाटलं मला..आणि खर प्रेम पण समजलं… खऱ्या प्रेमाची वाट पाहण्याची ताकद आहे माझ्यात.. ते जेव्हा येईल तोपर्यन्त मी पण ब्रेकअप घेतो प्रेमा पासून आणि थोडा स्टडी वर प्रेम करतो,मनापासून…"अधिराज हसत म्हणाला..

"काही ही झालं ना तरी कधी एकट नको वाटून घेऊ,आमच्या दोघांचं प्रेम आहेस तू,तुला थोडं काय झालं तर नाही सहन होत रे आम्हला, जीव आहेस तू आमचा..परत अस वेडेपणा नको करू…. आम्हला प्रेम भेटलं आमचं म्हणल्यावर तुला पण नक्की भेटेल..अगदी स्वतःहून तुझ्याकडे येईल..तुला शोधत फक्त संयम ठेव आणि स्वतःला ओळख ,स्वतःची ओळख बनव…." अक्षरा चे डोळे भरून आले होते बोलता बोलता….

अधिराजने अक्षराला जवळ घेतलं…

"लव यु आई" अधिराज म्हणाला..

"लव यु,बोथ ऑफ यु"अस म्हणत अभिने दोघांना जवळ घेतलं…

Click to Read More...Leave a Reply

To leave a comment, please Login or Register

Comments (0)