न झेपणार्‍या अंगठ्या..

न झेपणार्‍या अंगठ्या..

#आवळा देऊन कोहळा काढणे..


"हे बघ मी काय घेऊन आलोय"

"काय"

"थांब जरा बॅग मधून काढू तर दे"

"हे काय, अरे बापरे एवढं महागाईत,कोणी दिल तुम्हाला"

"कोण देणार मला हे"

"हम्मम,चोपडे साहेबच !"

"हो ग,ते अगदी आपल्याला घरातील मानतात गं, म्हणून च एवढ्या महागाईच्या काळात पण त्यांनी आपल्याला दोघांना ह्या सोनाच्या अंगठ्या दिल्या"

"हो पण उपकारच ना,झाले ना वो ते आपल्यावरच"


आई - बाबांचं सगळं बोलणं ऐकत होती स्नेहा.

स्नेहा मध्येच म्हणते," बाबा ,कशाला घ्यायचं तुम्ही हे ,आता तुम्हाला ते रविवारी पण सुट्टी नाही देणार"

"तसं नाही ग चिमणे,काम करतो मी त्यांच्यासाठी" बाबा.

"हो ,पण चोपडे साहेबाना चांगलं माहीत आहे ,'आवळा देऊन कोहळा कसा काढायचा ते' ,त्यामुळे ना मला या अंगठयांची काही किंमत नाही वाटत,बाबा"…स्नेहा बाबांना म्हणते.

"जाऊ दे, कष्टाचेच आहेत म्हणा कुठे त्यांनी फुकट दिलेत" आई म्हणते.

"हो ना, आई तुला आठवतेय ना आई मागच्या दोन वर्षात त्यांनी दादाला लॅपटॉप दिला होता ,वाढदिवसाला आणि बाबां कडून किती काम करून घेतलं होतं" स्नेहा.

"कसं विसरेल ते मी, ते किती आजारी पडले होते त्यावेळी" आई.

"बाबा, वय झालाय आता तुमचं ,एवढी दगदग नाही पाहवत हो आम्हांला, तुमची.सोडून द्या त्या साहेबांचं काम " स्नेहा बाबांचा हात,तिच्या हातात घेऊन म्हणत असते.

"बाळा,सगळं हे तुमच्यासाठीच असते गं,"बाबा थोडे डोळे भरूनच.

"पण बाबा आता दादा आणि मी थोडं फार कमावतोच की,तुम्हाला हातभार लावतोयच ना" स्नेहा बाबांना म्हणते.

"अगं, वेडाबाई ते तुम्हालाच राहू दे, हात पाय चालू आहेत तोपर्यन्त करतो काम " बाबा सगळ्यांकडे पाहत म्हणतात.

"ते ठीक आहे ,मी तुम्हाला चोपडे साहेबांचं काम सोडायला सांगतेय,बाकी तुम्हाला जे आवडेल ते करा ना काम तुम्ही" स्नेहा म्हणते.

"आता ,कसं सोडता येईल गं बाळा त्यांनी एवढ्या अंगठ्या दिल्या अजून दोन-तीन वर्षे तर त्यांच्याच इथे काम करावं लागेल" बाबा त्या अंगठ्याकडे पाहत म्हणाले.

जणू त्या अंगठ्या म्हणजे एका साठ वर्षाच्या वृद्ध माणसाकडून ,स्वतःच गिफ्ट म्हणून दिलेल्या अंगठ्या इथुनपुढे दोन-तीन वर्षे तरी काम सोडून जाऊ शकत नाही याची हमीच वाटत होती.

 "हेच,बाबा म्हणूनच म्हणले त्यांना चांगलं माहीत आहे,"आवळा देऊन कोहळा कसं काढायचा ते" .

स्नेहा म्हणते.


"चालायचंच ग" बाबा तिला म्हणतात.


लाज वाटते अशा माणुसकीची ज्यांना फक्त त्यांच्या कामचंच पडलेले असते,समोरच्या माणसाकडून कस काम काढून घेयचे ही पण कलाच म्हणावी लागेल.

नाहीतर,चांगल्या आणि संस्कारी माणसांना हे जमनच अशक्य !


काहीतरी गिफ्ट च्या नावाखाली देयच आणि फुकट काम करून घ्यायची ही वृत्तीच खूप वाईट,त्यांना एवढं पण समजत नाही की,गिफ्ट पाहून समोरच्याला आनंद तर झालाच नाही उलट त्याला पश्चातापच होतोय म्हणून.


Click to Read More...


Leave a Reply

To leave a comment, please Login or Register

Comments (0)