ब्रेकअप - प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग # ४

ब्रेकअप - प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग # ४

💕भाग# 4💕

"परत दोन दिवस ही मला दिसलीच नाही,क्लास मध्ये पण नव्हती" अभिमन्यू..

"मी कॉलेजला येत होते पण आमची कलासरूम बदलली होती ना,म्हणून भेट झाली नाही,माझ्या मनात ओढ होती भेटण्याची पण त्याच्याकडून म्हणावा तसा काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून मग मी शांतच बसले" अक्षरा..

"हो,माझीच वाट पाहत बसायची,जेव्हा मी विचारेल तेव्हाच इतरवेळी मग फक्त फक्त शांत बसायची,मनातील काही बोलायची नाही… अगदी तुझ्या सारखी" अभिमन्यू..

"नाही बोलता येत सगळयांना मनातली,धाडस पण होत नाही आणि भीती पण राहते ना मनात" अधिराज गंभीर होत म्हणाला…

"हे खरं आहे,नव्हतं येत मला बोलायला सगळं,पण अभि ला चांगलं जमत होते माझ्या मनातील ओळखायला"अक्षरा..

"पण तुम्ही बोलला कसं" अधिराज पुन्हा स्टोरी ऐकण्यासाठी उत्सुक…

"दिसली ना,मला तिसऱ्या दिवशी ,लॅब च्या बाहेर...बुक होत हातात,पाहत होती ,तोंड पाडून ..'काय झालं,काही समजत नाही का,?? आणि कुठे गायब होतीस?? पहिला नंबर दे तुझा मला" अभिमन्यू..

"ही रिअकॅशन समजत नाही मला… आणि इथेच होते कलासरूम बदलली होती ना...आठवण येत होती का तुला??" अक्षरा..

"म्हणजे तस नाही,पण तू म्हणली होती ना म्हणून म्हणलं, मला आज हिचा नंबर पाहिजेच होता कसल्याही परिस्थिती मध्ये..म्हणून मग म्हणलं ,मोबाईल पाहू तुझा" अभिमन्यू..

"अस,म्हणत त्याने माझ्या हातातून फोन घेतला आणि त्याचा नंबर सेव पण केला आणि रिंग पण दिली… "अभिमन्यू" नाव आहे तर… छान आहेस" अक्षरा म्हणाली..

"आता सुरवात झाली होती आमची.. बोलायची आणि घट्ट मैत्रीची…." अभिमन्यू….

"म्हणजे तुम्ही एकमेकांना प्रपोज नाही केलं का??" अधिराज..

" लगेच नव्हतं करायचं आम्हला, दोघांच्या घरून लव रिलेशन ला विरोधच होणार होता म्हणून एकमेकांना वेळ घालवायला आवडत होते म्हणून आम्ही मैत्रीचं नाव ठेवलं..पण त्यात तेवढीच काळजी होती आणि परिपूर्ण प्रेम पण" अक्षरा म्हणाली..

"मला एवढं तर माहीत होते की मला तिच्यासोबत राहायला आवडत होते,वेळ कसा जात होत होता तेच समजायचं नाही,ती अगदी माझ्यावर हक्क दाखवायची, जेवणासाठी थांबायची..कधी कधी तर माझं प्रॅक्टिकल उशीर पर्यन्त चालू राहील ना,तर बेधडक आत यायची आणि बाय म्हणण्यासाठी, मला न भेटता कधीच घरी नाही गेली ती"अभिमन्यू..

"म्हणजे हो,एकमेकांसाठी च आहोत आपण..म्हणून सगळा जीव ओतून मी त्याच्यासोबतच नात जपत होते...लग्नाचा विचार दोघांनी नव्हता केला खास असा..कधी रोमान्स पण नाही किंवा कधी प्रेमाच्या गोष्टी पण नाही केल्या.."अक्षरा…

"हो,याकडे मी कटाक्षाने लक्ष दिले होते,अस मी तिला कधीच काही बोललो नाही पण मला खात्री होती की हिच्या आयुष्यात माझ्या शिवाय अजून दुसर कोणी येणार पण नाही आणि कोणी आलं तरी ही मला नक्की सांगेल"अभिमन्यू…

Click to Read more...Leave a Reply

To leave a comment, please Login or Register

Comments (0)