
फुलपाखरू भाग #1
गोड बातमी- "तितली"
सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात शेवटचे गाव अगदी कडेला म्हणले तरी चालेन,अर्थातच त्यामुळे त्याचा अजिबातच विकास नाही,अजून ही त्या गावला जायचे म्हणले ना की आपली लाल परी जात नाही.हो,तिथे अजून एस.टी. जात नाही,दुसर्या मार्गावरून म्हणजे पुणे जिल्ह्यात जायचे म्हणले तर जाता येत नाही. पण त्याच जिल्ह्याची लाल परी येते सकाळी एकदा च,पण तिचा काही फारसा उपयोग होत नाही,कारण सगळ्यांचे वावरायचे ठिकाण पुणे जिल्ह्यातच आहे ना.
असो,तिथेच गणपतराव सातार्यावरून रुसून आले होते आणि त्याच गावामध्ये स्थायीक झाले,त्यांचे नातू म्हणजे हनुमंत पाटील. हनुमंत चे वडील म्हणजे राम पाटील. गणपत रावांनी खूप कष्ट आणि मेहनत करून शेती कमवली,तसेच त्यावेळी ते नेहमी घोडा वापरत,घोड्यावरून प्रवास म्हणजे त्याचे ते वाहन झाले.त्यांचा थाट च वेगळा होता. दुसर्या गावातून येवून पण त्यांनी त्यांचे अस्तित्व तयार केले होते. मजूर त्यांना घाबरत असतं. चुकीला माफी कधीच त्यांनी ठेवली नाही,एक दरारा होता त्यांच्या शिस्तीचा.दुसरी बाजू अशी की ते तेवढेच दत्ताचे परमभक्त होते आणि आज ही त्यांच्या वंशजाकडेच दत्ताचा मुकुट आणि पैजण आहेत,तशी त्या गावात दत्त जयंती ची प्रथा त्यांनीच काढली आणि अजुनही ती कार्यरत आहे.खर तर दत्त जयंतीचा सोहळा संध्याकाळी सहा वाजता असतो,सगळीकडे पण इथे नाही. इथे दुपारी बारा वाजता च गुलाल पडतो आणि जेवण म्हणून प्रसाद असतो. त्यानंतर गणपतराव गानगापूर ला संध्याकाळी दत्तजयंती ला जायचे,एवढे ते अस्सीम दत्ताचे भक्त होते.
त्यांना दोन मुलेच होती,पण दोन्ही आळशी आणि आहे त्यात समाधानी असणारी. वडिलांकडून मिळालेली वारसा हक्काची जमीन आणि काही जनावरे ,दोन ट्रक आणि एक ट्रॅक्टर हे पण त्यांना आपल्या मुलांना देता आले नाही. त्यांचा थोरला मुलगा राम तो नंतर ट्रक ड्रायवर झाला आणि बारामती मध्येच स्थायीक झाला. दूसरा शिवाजी मात्र तो गावातच राहून शेती पाहत असे.
राम ला तीन मुले आणि दोन मुली होत्या.थोरला मुलगा एसटी मध्ये ड्रायवर झाला तर मधवा शेती आणि धाकटा म्हणजे हनुमंतच,तो मात्र अथक प्रयत्नानंतर पाटबंधारे विभागात कामाला लागला आणि दोन्ही मुलींची लग्न झाली,त्या त्यांच्या संसारात खुश आणि रमून गेल्या होत्या.राम कधी मुलांसोबत राहिला नाही,त्याने शेवटपर्यंत एकटाच राहिला,जेवला मात्र तो महिना महिना अस आपल्या मुलांच्या घरी जायचा.आयुष्यात खूप अतिपना केला पण आयुष्याच्या शेवटी त्याने खूप वाचन आणि देवधर्म केला. त्याचा नातवंडांवर त्याचा खूप जीव होता. शेवटी सगळ्या बारा नातवंडांना भेटून च जीव सोडला.
पण त्यांचा सगळ्यात जास्त जीव त्यांच्या सगळ्यात लहान मुलावर होता म्हणजे पाच नंबरच्या,हो म्हणजे हनुमंत वर,त्यांचे फारसे पटत नसे,पण त्यांचे प्रेम एकमेकांवरचे कधीच झाकले नाही.तो घरी येई पर्यन्त बापाचा डोळा लागला तर कसं. हनुमंत ने त्यांच्या उतार वयात मात्र बापाची खूप सेवा केली आणि आयुष्याचे पुण्य मिळवले.
हनुमंत,सगळ्यात लहान,पण तेवढाच आगवू आणि हुशार,