फुलपाखरू भाग # 3

फुलपाखरू भाग # 3

नकोस वाटणार- गावं

चला जे होते नव्हते ते सगळं घेवून खर आलो गावाला,आता इथे किती दिवस राहयचे हे काही अजून ठरले नाही,पण कदाचित काय,स्वरूपी रहावे लागणार ,एवढे तरी नक्की होते.

गाव आणि शेती यामध्ये जवळ जवळ दोन किलोमीटर चे अंतर होते म्हणून गावामध्ये राहणे तर शक्यच नव्हते,पण अडचण अशी होती की गावामध्ये घर चांगलं होते राहण्यासारखे आणि सगळ्या सुविधा पण होत्या पण शाळा पण लांबच होती,मग सगळा विचार करून परत शेतात च राहायचा निर्णय झाला.

शेत,जिथे दूर दूर वर मनुष्य वस्ती नाही,जोरात ओरडले तर मदतीला कोणी सुद्धा धावून येणार नाही. तितली च्या बाबांनी छप्पर चे घर आधीच बांधले होते,त्यावेळी तशी घर बांधन सोपे जायचे आणि कमी खर्चाचे पण असायचे.त्याच बरोबर अजून थोडेस चांगलं बांधूयात म्हणून पत्र्याचे शेड उभे केले,चारी बाजूने पत्रा आणि त्याला पण खूप सारी मोठी मोठी भोके,बाहेर काय चाललाय ते आरामात दिसायचे म्हणून खिडकीची अजिबात गरज च पडली नाही,खाली मात्र सिमेंटचा कोबा केला होता,मऊ मऊ.पण वावरणे सगळं छ्परच्या घरताच असे.तस दोन्ही घर शेजारी शेजारीच होती. सगळं बदलले होते,सगळच.

नवीन शाळा,नवीन माणसे,नवीन परिसर आणि विशेष म्हणजे नवीन असलेली जीवनशैली.

शाळा तिथून जवळच होती तरी चालत म्हणले तर वीस -पंचवीस मिनिट लागतील,चालत जात असे ती,तिच्या चुलत बहिणीसोबत,पहिला दिवस म्हणजे सगळ्यात भयानक असतो ना!

वर्ग च सापडेना,बहीण सोबत होती म्हणून बर झाले होते,थोडे दिवस तिच्याजवळच जेवायला वैगेरे जायचे मग झाली ओळख हळूहळू.

वर्ग तरी कसले म्हणायचे आणि ती शाळा तरी कसली,अजून बांधकाम पण पूर्ण झाले नव्हते ,खाली बसले तरी खडबुडा सिमेंटचा थर सगळा पायाला रुतायचा आणि खूप टोचायचा,बसून बसून पायाला नको नको होयचे.

तितली ला नको झाले होते,तिला जुन्या शाळेची खूप आठवण येत होती,इथे काही दिवस सगळे तिच्याकडे फक्त पाहतच होते,बोलायचे ते फक्त शिक्षक चं. त्यामुळे तिने अभ्यासतचं स्वता:ला जास्त वाहून घेतले,आता ती आठविला गेली होती.इथे शिकलेले तिला बर्‍याच गोष्टींचा उपयोग तिला ह्या नवीन शाळेत झाला,त्यामुळे सगळ्यांना असे वाटयला लागले की, तितली खूपच हुशार आहे. तिचे वेगळेपण सगळ्यांपासून दिसून येयचे.

तिला सांगायला लाज वाटायची की आम्ही छप्परच्या घरात राहतो म्हणून,ती कधीच तिच्या मैत्रिणी असताना घराबद्दल ती कधीच बोलायची नाही,शांत बसायची.तिच्या हे सगळे हळू हळू डोक्यात बसायला लागले होते,आपण सगळे चित्र बदलायचे अस तिने ठरवले,खूप शिकायचे आणि खूप मोठी जास्त पैशाची नोकरी मिळवायची.

Read Continue More....


Leave a Reply

To leave a comment, please Login or Register

Comments (0)