वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington and America

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington and America

वॉशिंग्टन आणि अमेरिका

 

मोहनराव आज भलतेच खुश होते. अगदी सकाळी सकाळी मेल आला होता त्यांना. मुलाचा. ऊसातून. आपला वाला ऊस नव्हे. यूएसए यूएसए. यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका! तिथून.

म्हणाला होता- बाबा, परत एकदा आजोबा होणार आहात तुम्ही. यावेळी नातू होणार आहे तुम्हाला. म्हटलं बोलावून घ्यावं. मधल्या काळात नाही जमलं काही. फ्लाईटचे तिकीटही पाठवत आहे. याल ना? कायमचं? क्षितिला पण तिच्या आजोबांना प्रत्यक्ष पाहायचंय.

एका जीर्ण झालेल्या वृक्षाला खालून त्याचीच नातवंडे साद घालीत होती. वाटलं होतं ही पानगळ शेवटचीच; पण एक बहर तरी अजून घ्यावा म्हणतोय जणू तो वृक्ष. पूर्वीसारखी पालवी फुटणार नाही कदाचित, कदाचित नाही बहरणार तो हरित पर्णसांभार डोळ्यांत भरण्याजोगा; पण नातवंडांच्या ओढीने चारदोन हिरवी पाने जरी फुटली तरी या वृद्ध वृक्षास का नको आहेत?

हातातील काठीचा आधार घेत आपले थरथरते शरीर सावरत ते खुशीतच सारखे आपले आतबाहेर करीत होते. कधी त्या भिंतीवर टांगलेल्या आपल्या मृत पत्नीच्या तस्वीरीला येताजाता बोलत होते तर कधी ते वॉशिंग्टनशी संवाद साधत होते.

वॉशिंग्टन, त्यांचा कुत्रा! हे बोलायचे आणि तो भुंकायचा!

दहा वर्षांपूर्वी क्षिति जन्मली तेव्हा आणला होता त्यांनी आणि मिसेस मोहनराव यांनी त्याला घरी. आपली छोटी नात भारतात आल्यावर तिच्यासोबत खेळण्यासाठी. पुढच्या महिन्यात ती आता दहा वर्षांची होणार होती. लहानच होती अजून ती; मात्र वॉशिंग्टन? तो आता सिनिअर सिटीझन झाला होता अगदी! मागील दहा वर्षांत तो  मोहनराव यांचा जणू मुलगाच झाला होता म्हटलं तर काही वावगं ठरायचं नाही. मिसेस मोहनरावांना तर आता पाच वर्षे झाली जाऊन. मुलगा अमेरिकेला. तेव्हा आता वॉशिंग्टनच काय तो त्यांचा आधार होता. कुत्रा असला तरी तो त्यांना उपरा बिलकुलच नव्हता!

आजोबा, एका जागी बसून घ्या. सकाळपासून खूप येरझाऱ्या मारल्यात तुम्ही. अजून अमेरिका दूर आहे. नाहीतर आधीच ढगात जाल. घरकामात गुंतलेली मीराबाई म्हणाली.

मग माझी सगळी इस्टेट तुम्ही दोघं नवरा बायको बळकवाल आणि मग मी भूत होऊन इथं भटकत राहीन आणि तुम्हाला त्रास देईन. मोहनराव कापऱ्या आवाजात म्हणाले.

मला वाटलं तुम्ही अमेरिकेला जाऊन तुमच्या सुनेला आणि मुलाला त्रास द्याल. मीराबाईचा नवरा सखाराम म्हणाला. तोही घरकामात व्यस्त होता.

असं कसं, त्यांचा तर पहिला समाचार घेईन मी. मोहनराव आवेगाने म्हणाले.

पण भूतांना असा इंटरनॅशनल प्रवास करता येतो? सखारामने विचारले.

तसंही भुते दिसतात कुठे? जातील गुपचूप एखाद्या विमानात बसून. मीराबाई म्हणाली.

हे तर मग उत्तमच झालं. माझे तिकिटाचे पैसे तर वाचतील. मोहनराव हसतच म्हणाले.

दुपारपर्यंत त्यांनी तो मेल किमान दहादा तरी उघडला असेल नी नजरेखालून घातला असेल. आपल्या जाड भिंगांच्या चष्म्याच्या दांडीला पकडून त्यांनी तो पुनःपुन्हा वाचला होता.

वॉशिंग्टनला त्यांच्या खुशीचे कारण समजायला तसा फारसा वेळ लागला नाही. तो अगदी लहानपणापासून त्यांना त्या मोठ्या डोक्याच्या कॉम्प्युटरसमोर बसलेले पाहत आला होता आणि कित्येकदा निराशेने त्याच्यासमोरून उठताना देखील. भलेही वॉशिंग्टन अमेरिकेत असले तरी या वॉशिंग्टनला काय कळणार अमेरिका, ती आहे काय आणि असते कुठे? त्याला बस्स एवढेच कळत होते की ते नावराबायको आपल्या मुलाची वाट पाहताहेत जो की बरीच वर्षे त्यांच्याकडे परतलाच नाही!

संपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या 

https://lekhanisangram.com/washington-and-america


Leave a Reply

To leave a comment, please Login or Register

Comments (0)